दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६
"काय माझा गुन्हा...?" भाग ४
"जा या घरातून... चालती हो माझ्या आयुष्यातून... तुझं तोंड सुद्धा पाहायची इच्छा नाही माझी...जा... इथून..." माधव अक्षरशः तीला दरवाजाकडे ढकलून देतो...
"अहो...पण माझं ऐकून तरी घ्या... तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल... माझं म्हणणं एकदा ऐकून घ्या... मी खरंच असं काहीच केलं नाही आहे..." गौरवी रडकुंडीला आणि काकुळतीला येऊन बोलते...
"ऐ भवाने... तुला माधवने बोललेलं ऐकू नाही आलं का...? चालती हो या घरातून..." नणंद ओरडत मोठमोठ्याने बोलते...
"मी नाही जाणार या घरातून...हे घर माझं सुद्धा आहे... माझा सुद्धा हक्क आहे या घरात..." गौरवी रडत रडत बोलते
" तू आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून बाहेर हो... हे तुझं घर नाही आहे... समजलं..." माधव जोरजोरात ओरडत बोलतो...
"अहो.. पण ऐकून तर घ्या...तुमचा खरंच काहीतरी गैरसमज झाला आहे ...मी खरंच असं काहीही केलं नाहीये...मी शप्पथ घेऊन सांगते... मी खरंच त्या माणसाला ओळखत नाही.. तो आपल्या बेडरूममध्ये कसा आला मला माहित नाही... तुम्ही प्लीज माझं एकदा म्हणणं ऐकून तरी घ्या..." गौरवी माधवचा हात आपल्या हातात घेत बोलते...
माधव आपला हात गौरवीच्या हातातून झटकवून घेत तीला बोलतो...
"नाही... मला तुझ्याशी कोणतेही संबंध ठेवायचे नाही... मला तुझं तोंडही पाहायचं नाही... मला तुझ्यासारख्या चारित्र्यहीन स्त्री सोबत कोणतंही नातं नकोय... त्यामुळे आपला संबंध इथेच तुटला... तु आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालती हो..."
असं म्हणत माधव तिला अक्षरशः घरातून बाहेर ढकलून देतो...
"नाही... मला तुझ्याशी कोणतेही संबंध ठेवायचे नाही... मला तुझं तोंडही पाहायचं नाही... मला तुझ्यासारख्या चारित्र्यहीन स्त्री सोबत कोणतंही नातं नकोय... त्यामुळे आपला संबंध इथेच तुटला... तु आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालती हो..."
असं म्हणत माधव तिला अक्षरशः घरातून बाहेर ढकलून देतो...
आणि गौरवी माधवला अडविण्याचा खुप प्रयत्न करते... पण सर्व काही व्यर्थ ठरतं तीच्यासाठी...
कारण तीची बाजू घेणार तीथे कोणीही नसतं... ज्याच्यावर डोळे मिटून आंधळा विश्वास ठेवून लग्न करून ज्याच्या घरात आली आज तोच तीचा आंधळा विश्वास... तीची कोणतीही बाजू ऐकून न घेता..., सत्याचा पाठपुरावा न करता... फक्त जे डोळ्याने दिसले त्यावर विश्वास ठेवून तीला आज तो घराबाहेर काढतो... आणि तो त्या अवस्थेतच स्टडी रुममध्ये निघून जातो...
तर तिची नणंद तिच्या बेडरूममध्ये जाऊन तीच्या कपड्याची बॅग भरून बेडरूममधून बाहेर घेऊन येते व मुख्य दरवाजातून बाहेर फेकून देते... आणि घराच्या दरवाजावर हाताची घडी घालून ठसक्यात उभी राहते... आणि धाडकन दरवाजा बंद करते...
गौरवीला अक्षरशः दरवाजाबाहेर ढकलून दिल्यानंतर तो जड लाकडी दरवाजा “धाडकन” असा जोरदार, कानठळ्या बसवणारा आवाज करून बंद झाला...
त्या तीव्र धडकेने संपूर्ण संकुक्षित गल्ली दणाणून उठली, जणू आकाश ठिणगी उधळत रागावले असावे...
त्या तीव्र धडकेने संपूर्ण संकुक्षित गल्ली दणाणून उठली, जणू आकाश ठिणगी उधळत रागावले असावे...
गौरवी दरवाजावर जोरजोरात हात आपटत..., दरवाजा ठोकत व रडवलेल्या चेहऱ्याने माधवला हाका मारत दार उघडण्यासाठी विनवणी करत असते...
तेवढ्यात पुन्हा दरवाजा उघडला जातो... दरवाजा उघडत असताना गौरवीच्या मनात एक छोटासा आशेचा किरण निर्माण होतो...
पण दरवाजा उघडल्यावर मात्र समोर ननंदेला पाहून गौरवीची निराशा होते... पण तरीही ती दरवाजाच्या आत डोकावून पाहत तीची नजर माधवला शोधत असते...
परंतु संस्कृती ननंद बाई तीला मागे ढकलते आणि तीच्या गळ्यातील मंगळसूत्राला हात लावत म्हणते... "हे काढून दे... याची तुला आता गरज नाही... कारण त्याच्या लायकीची तु नाहीस... तुमच्या लोकांची लायकीच दरवाजाच्या बाहेर आहे... कळलं... आमची बरोबरी करायला आलीस... आलीस ते आलीस पण सरळ माझ्याच घरात..."
संस्कृतीच्या त्या शब्दांनी गौरवीच्या छातीत काहीतरी तुटून पडतं...
मंगळसूत्राकडे पाहताच तिचे हात थरथर कापू लागतात…
तेच मंगळसूत्र, ज्याला तिनं देवासारखं जपलं होतं,
आज अपमानाचं ओझं बनून तिच्या गळ्यात अडकलेलं असतं...
मंगळसूत्राकडे पाहताच तिचे हात थरथर कापू लागतात…
तेच मंगळसूत्र, ज्याला तिनं देवासारखं जपलं होतं,
आज अपमानाचं ओझं बनून तिच्या गळ्यात अडकलेलं असतं...
गौरवी हळूच हात वर नेते…
बोटांनी मंगळसूत्राचा दोरा धरते…
डोळ्यांतून अश्रूंच्या धारा ओघळत असतानाही,
तिच्या ओठांवरून फक्त एकच वाक्य निघतं...
बोटांनी मंगळसूत्राचा दोरा धरते…
डोळ्यांतून अश्रूंच्या धारा ओघळत असतानाही,
तिच्या ओठांवरून फक्त एकच वाक्य निघतं...
“हे काढायला सांगायची तुझी हिम्मत कशी झाली...?
हे मंगळसूत्र काढण्याआधी माझा नवरा आणि तुझा भाऊ समजून घेतला असता ना तु तर अशी चोर पावलांनी मंगळसूत्र मागायला आली नसतीस…”
हे मंगळसूत्र काढण्याआधी माझा नवरा आणि तुझा भाऊ समजून घेतला असता ना तु तर अशी चोर पावलांनी मंगळसूत्र मागायला आली नसतीस…”
पण संस्कृती हसते.
ते हसू नव्हतं…
ते विजयाचं, विषारी हसू होतं.
ते हसू नव्हतं…
ते विजयाचं, विषारी हसू होतं.
“नवरा…?”
ती उपहासानं म्हणते...
“ज्याला तू फसवलंस तो नवरा...?
आणि ज्या घराची तू इज्जत लुटलीस ते घर तुझं...?”
ती उपहासानं म्हणते...
“ज्याला तू फसवलंस तो नवरा...?
आणि ज्या घराची तू इज्जत लुटलीस ते घर तुझं...?”
असं म्हणत ती गौरवीच्या गळ्यात हात घालुन जोरात मंगळसूत्र ओढते...
आणि मंगळसूत्राचा दोर तुटतो....
व मंगळसूत्राच्या काही काळ्या मन्या जमिनीवर पडतात…
आणि त्या क्षणी गौरवीचं आयुष्यही तिथेच कोसळतं...
व मंगळसूत्राच्या काही काळ्या मन्या जमिनीवर पडतात…
आणि त्या क्षणी गौरवीचं आयुष्यही तिथेच कोसळतं...
गौरवी खाली बसते...
ती रडत नाही…
ओरडत नाही…
फक्त पाषाणासारखी स्तब्ध होते...
ती रडत नाही…
ओरडत नाही…
फक्त पाषाणासारखी स्तब्ध होते...
कारण काही वेदना अशा असतात,
ज्या अश्रूंनाही मोकळं व्हायला मार्ग देत नाहीत...
ज्या अश्रूंनाही मोकळं व्हायला मार्ग देत नाहीत...
संस्कृती तिची बॅग पायाने पुढे ढकलते...
आणि म्हणते...
“घे आणि निघ...
परत कधी या उंबरठ्याशी दिसलीस,
तर लक्षात ठेव...
दार उघडणार नाही… तर चोरीचा आळ घालून पोलिस बोलविन....”
असं म्हणत ती दार बंद करते...
आणि म्हणते...
“घे आणि निघ...
परत कधी या उंबरठ्याशी दिसलीस,
तर लक्षात ठेव...
दार उघडणार नाही… तर चोरीचा आळ घालून पोलिस बोलविन....”
असं म्हणत ती दार बंद करते...
पुन्हा आवाज येतो दरवाजाचा... धाडकन...
गौरवी एकटीच उभी राहते…
पावसात…
अंधाऱ्या गल्लीत…
हातात फाटलेलं आयुष्य घेऊन...
पावसात…
अंधाऱ्या गल्लीत…
हातात फाटलेलं आयुष्य घेऊन...
आणि त्या घरात...
स्टडी रूममध्ये बसलेला माधव…
खिडकीतून बाहेर पाहतो…
स्टडी रूममध्ये बसलेला माधव…
खिडकीतून बाहेर पाहतो…
पावसाच्या आवाजात
कुणीतरी आतून त्याला विचारत असतं...
कुणीतरी आतून त्याला विचारत असतं...
“जर ती खरंच निरपराध असेल तर…?”
तो प्रश्न अजून हलकासा असतो…
पण हळूहळू
तोच प्रश्न
त्याचं आयुष्य पोखरणार असतो…
पण हळूहळू
तोच प्रश्न
त्याचं आयुष्य पोखरणार असतो…
क्रमशः...
©® प्राची कांबळे (मिनू)
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा